व्हीएसआरएस मराठी न्युज –मुक्ताईनगर : दि.२५ आदिशक्ती श्री संत मुक्ताई आईसाहेबांचा ७२५ वा अंतर्धान दिन अर्थात समाधी सोहळ्या निमित्त पांडुरंगाच्या पालखीचे आगमन येथे झाले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजां कडून साडी चोळी सालाबाद प्रमाणे संस्थानचे विश्वस्त श्री योगेश देसाई यांनी श्री संत आदीशक्ती मुक्ताई संस्थान मेहुण तापीतीर गुप्तस्थळ येथे संत मुक्ताई चरणी अर्पण केली.
तसेच संत मुक्ताई संस्थान च्या वतीने अध्यक्ष श्री रामराव महाराज (विश्वस्त) श्री सुधाकर महाराज यांनी श्री योगेश देसाई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
आदिशक्ती श्री संत मुक्ताई आईसाहेबांचा ७२५ वा अंतर्धान दिन अर्थात समाधी सोहळ्या निमित्त मोठया संख्येने वारकरी भाविकांनी संत मुक्ताई यांच्या दर्शनासाठी गर्दी केली.
Discussion about this post