Mumbai News : मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे शिंदे गटातील एका मोठ्या संघर्षाचा फैसला आज होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्यासंदर्भातील प्रकरणावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा निकाल दिला जाईल असे समजते.
२० जून २२ रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत ४० आमदार फोडले होते. गुवाहाटी येथे गेल्यानंतर आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यावर त्यानंतर पक्षादेश भंग केल्याप्रकरणी ठाकरेगटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्षांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. आज या प्रकरणी विधानसभाध्यक्ष निकाल देणार आहेत.
Discussion about this post