व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पिंपरी महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहराती सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजता राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे.
१५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अशी प्रथा सुरु करणारी, पिंपरी चिंचवड ही राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचे प्रशासक व आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
पिंपरी पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट ‘ड्रेसकोड’ लागू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. निश्चित केलेले गणवेश परिधान करून १५ ऑगस्टपासून पालिका अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या दरम्यान “घरोघरी तिरंगा” अर्थात “हर घर तिरंगा ” या अभियानात सर्व नागरिकांनी सामील व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा.
Discussion about this post