व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –डी.आय.सी एस् इंग्लिश मीडियम स्कूल , मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आले.
मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन म्हणून सर्व स्कूल व सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो . यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डी. आय. सी. एस् इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रभात फेरी , सर्व मुलांसाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडाविषयक प्रचार व प्रसारासाठी सहाय्यभूत ठरतील अशा उपक्रमाचे आयोजन तसेच क्रीडा वैद्यकशास्त्र , क्रीडा मानसशास्त्र , आहारशास्त्र तसेच सध्याची क्रीडा परिस्थिती आणि वेगवेगळ्या स्पोर्ट्स मुळे होणारे फायदे , खेलो इंडिया , फिट इंडिया , यासारखे नवनवीन उपक्रम मुलांसाठी किती फायदेशीर आहेत , मुलांमधील स्मरणशक्ती वाढणे , स्पोर्ट्स चे मार्क वाढणे , तसेच स्पोर्ट्स मध्ये राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यास मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्समधील जॉब उपलब्ध असतात ,या सर्व क्रीडा विषयक मार्गदर्शन स्कूल मधील क्रीडा मार्गदर्शक व शिक्षक श्री. मनोज काळे व श्री. लक्ष्मण नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले .
मुलांना खेळ व त्याचे जीवनातील महत्त्व, तंदुरुस्ती, शरीरासाठी कोणकोणते खेळ खेळावेत याविषयी मार्गदर्शन स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षा जोशी , व स्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ. सारिका कुलकर्णी यांनी केले व स्पर्धेत सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला .
Discussion about this post