व्हीएसआरएस मराठी न्युज चिंचवड -पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे.
या कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी तणाव निर्माण झाल्यानंतरे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता.
याआधी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकमेकांसमोर आल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने सत्ताधारी भाजपाने ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासना विरोधात आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला यात मा. नगरसेविका शमिमबाई पठाण जखमी झाल्या तसेच पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते जखमी झाले सदर घटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले.
Discussion about this post