व्हीएसआरएस मराठी न्युज -एनसीसीच्या राज्यातील ग्रुप कमांडर्सची बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दरम्यान, एनसीसी छात्रसैनिकांना मैदानी स्पर्धा, कवायत, नेमबाजी प्रशिक्षणासाठी कायमस्वरुपी शिबीर व्यवस्था म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात पुणे आणि औरंगाबाद येथे ‘एनसीसी प्रशिक्षण संकुल’ उभारणी केली जाईल. असा निर्णयही पवार यांनी जाहीर केला.
तसंच नंतरच्या टप्प्यात मुंबई, नागपूरसह अन्यत्रही ‘एनसीसी प्रशिक्षण संकुल’ उभारण्यात येणार आहेत. एनसीसी छात्रसैनिकांच्या न्याहरी भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रउभारणीतले महत्व लक्षात घेऊन एनसीसीच्या उपक्रमांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसंच राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासनही पवार यांनी या बैठकीत दिलं.
महाराष्ट्र एनसीसीच्या छात्रसैनिकांच्या माध्यमातून राज्याची लष्करीसेवेची, देशसेवेची परंपरा कायम राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्रातील एनसीसी ग्रुप कमांडर्सची वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक, मेजर जनरल वाय. पी. खंडूरी, महाराष्ट्र एनसीसीचे उप महासंचालक ब्रिगेडीयर एस. लाहिरी, एनसीसी महाराष्ट्रचे संचालक (नौसेना) कॅप्टन सतपाल सिंग, एनसीसी पुणे मुख्यालयाचे ग्रुपकमांडर ब्रिगेडीयर आर. के. गायकवाड, एनसीसी औरंगाबादचे ग्रुपकमांडर ब्रिगेडियर एम. एम. विटेकर, एनसीसी कोल्हापूरचे ग्रुपकमांडर ब्रिगेडीयर समीर साळुंखे, एनसीसी नागपूरचे ग्रुप कमांडर ग्रुपकॅप्टन एम. कलीम, एनसीसी नागपूरचे (डेजीग्नेट) ग्रुप कमांडर ग्रुप कॅप्टन बी. के. चौहान, एनसीसी मुंबई ए डिव्हिजनचे ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर सी. मढवाल, एनसीसी मुंबई बी डिव्हिजनचे ग्रुप कमांडर ग्रुपकॅप्टन एन. एस. देखने, एनसीसी अमरावतीचे कर्नल पी. राजनारायण, एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे श्री. प्रविण हातांगले, समीर जामदार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, मनोज सौनिक, वित्त व व्यय विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, शालेयशिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, क्रीडा व युवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव स्वाती नानल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post