व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) ची नवीन कार्यकारणी जाहीर केली.
त्यामध्ये शहराध्यक्ष म्हणून जेष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली त्या सर्वांचे अभिनंदन व सत्कार कार्यक्रम आमदार अण्णा बनसोडे यांचया काळभोरनगर येथील जनसंपर्क कार्यलयात आयोजित केला होता.त्यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष इमरान शेख,महिला अध्यक्षा कविता आल्हाट,शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले,जगदीश शेट्टी,प्रशांत शितोळे,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष निलेश निकाळजे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकार्याना आमदार अण्णा बनसोडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच त्यांना पक्ष जबाबदारी ची जाणीव करून दिली.यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्ष वरिष्ठांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करेल ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले. यावेळी मा महापौर योगेश बहल,मा नगरसेवक प्रसाद शेट्टी, संदीप चिंचवडे,सतीश लांडगे, सिद्धार्थ बनसोडे,प्रतीक इंगळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश शिंदे यांनी केले.
Discussion about this post