व्हीएसआरएस मराठी न्युज –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (२४ सप्टेंबर, २०२३) दुपारी साडेबारा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात येणार आहे.
या नऊ रेल्वे गाड्यांमुळे राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरात अशा अकरा राज्यांतील दळणवळणाला चालना मिळणार आहे.
या वंदे भारत गाड्या, त्यांच्या निर्धारित मार्गांवर सध्या धावणाऱ्या गाड्यांपैकी सर्वात वेगवान रेल्वे गाड्या असतील आणि त्यांच्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवास वेळेची मोठी बचत होणार आहे. सध्या धावणाऱ्या सर्वात वेगवान गाड्यांशी तुलना करता, राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस आणि कासारगोड-थिरूवनंतपुरम वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी करतील; हैदराबाद-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेसमुळे या प्रवासाचा अडीच तासांहून अधिक वेळ वाचेल; तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस हा प्रवास दोन तासांहून अधिक काळ लवकर पूर्ण होईल; रांची-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस, पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस तसेच जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या प्रवासाचा सुमारे 1 तास वाचवतील तर उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास नेहमीपेक्षा सुमारे अर्धा तास आधी पूर्ण होईल.
या आहेत नव्या वंदे भारत एक्सप्रेस
१) उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस
२) तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस
३) हैदराबाद-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस
४) विजयवाडा-चेन्नई (रेनीगुंता मार्गे) वंदे भारत एक्स्प्रेस
५) पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस
६) कासारगोड-थिरूवनंतपुरम वंदे भारत एक्स्प्रेस
७) राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस
८) रांची-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस
९) जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस
Discussion about this post