व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-आमदार नितेश राणे म्हणाले, आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान आहे का? की पाकिस्तान आणि अफगाणिस्थानमधील शरिया कायदा आहे? जर संविधानानुसार हा देश जर चालत असेल तर महापालिकेत उगाच खुर्च्या गरम करत अधिकारी बसले आहेत. त्यांनी त्यांचे काम केलं पाहिजे. तुमच्या खुर्ची काढायला काहीही वेळ लागणार नाही. अधिकारी यांना कळायला पाहिजे की त्यांना तिथं का बसवलं आहे? आम्ही जर कायदा हातात घेतला तर आतमध्ये बसलेले अधिकारी तोंड सुजून बाहेर येतील. आम्ही कोणतीही परिस्थिती खराब केलेली नाही. आम्ही कायदा तोडलेला नाही. कायदा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडला आहे. हा भारत देश हिंदू राष्ट्र असून या देशात 80 टक्के लोक हे हिंदू राहतात. जर देशात 80 ते 90 टक्के हिंदू लोक राहत असतील तर मग कशाला जिहादी लोकांचे लाड करायचे?
आमदार राणे म्हणाले, कोणात किती दम आहे? आत्ता महेश लांडगे यांनी घोडे लावायची भाषा केली आहे. तर एका वक्त्याने हातोड्याची भाषा केली आहे. पण आपली डायरेक्ट कापण्याची भाषा असते. आम्हाला ज्या दिवशी पुण्येश्वरची जागा पाहिजे, त्या दिवशी कोणीच आम्हाला थांबवू शकत नाही. येत्या 48 तासात पालिकेने कारवाई करावी नाहीतर आम्ही जागा घेऊ, असा इशारा देखील यावेळी राणे यांनी दिला.
पुणे शहरातील कसबा पेठ भागातअसलेल्या पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने महापालिकेसमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भाजप आमदार आमदार नितेश यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानाच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काळी फिती बांधुन काम बंद आंदोलन केले.
Discussion about this post