व्हीएसआरएस मराठी न्युज -दरवर्षी आखाडही ते असाच साजरा करतात. हे त्याचे सातवे वर्ष आहे. गेल्यावर्षी तो एकाच वेळी सहा ठिकाणी केला गेला. त्याचा ४३ हजार जणांनी लाभ घेतला. तर, यावेळी तो दहा ठिकाणी होणार आहे. त्याचे नियोजन त्या त्या भागातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे.
सत्तर हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. चुलीवरचे मटण आणि भाकरी तसेच सुगंधी इंद्रायणी भात व नंतर जिलेबी आणि गुलाबजामून असा फक्कड बेत आहे. २१०० किलो मटन, तेवढेच चिकण, बाराशे ३० किलोचे मासे, १३ हजार अंड्यांची व्यवस्था या पार्टीसाठी करण्यात आली आहे. काही मंगल कार्यालयेच त्यासाठी बुक करण्यात आली आहेत. या मेजवान्यांची निमंत्रणे देण्यास धडाक्यात सुरवातही झाली आहे. तीस लाख रुपये खर्च यावर होईल, असा अंदाज आहे.
Discussion about this post