व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन करण्यात येणार असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, रोजगार मेळावा, तज्ञ मंडळीचे परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी आरोग्य शिबीर, महापालिकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची सोय अशा विविध उपक्रमांद्वारे निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे कार्यक्रम होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्यासाठी महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारती मधील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे पूर्व नियोजन बैठक पार पडली. उपआयुक्त रविकिरण घोडके, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, माजी नगरसदस्य सचिन चिखले, माजी नगरसदस्या सुमन नेटके, अनुराधा गोरखे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जराडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, व्ही. एम. मांडरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे, मनोज तोरडमल, संजय ससाणे, अरुण जोगदंड, हनुमंत कसबे, नितीन घोलप, सुनील भिसे, धम्मराज साळवे, शिवाजी साळवे, बापू घोलप, युवराज दाखले आदी उपस्थित होते.
त्यामध्ये दर्जेदार कार्यक्रम ठेवावेत, पुतळा परिसरात साफसफाई करणे, कार्यक्रमात खेळाडूंना सन्मानित करावे, रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे, आदर्श मातांना सन्मानित करावे, परिसंवाद साठी नामांकित व्यक्तींना निमंत्रित करावे, विद्यार्थी आणि महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती कार्यक्रमात द्यावी आदी सूचना बैठकीत प्राप्त झाल्या.
Discussion about this post