व्हीएसआरएस मराठी न्युज -भोसरी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.5 , सागर भैय्या गवळी युवा मंच व कवीताताई भोंगळे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम नवमी निमीत्ताने गुरुवार दि. 30 मार्च 2023 रोजी भोसरी येथे भव्य दुचाकी रॅलीचे ” आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 30 मार्च 2023 रोजी स. 8 वाजता श्रीराम मंदिर चक्रपाणी वसाहत,भोसरी येथून रॅलीचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होणार असून पुढे – मंगलमुर्ती मेडिकल -पाण्याची टाकी- विदर्भ मित्र मंडळ -दिघी रोड या मार्गे येत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा PMT चौक, भोसरी या ठिकाणी रॅलीचा समारोप होईल. तरी भोसरी दिघी परिसरातील सर्व रामभक्तांनी पारंपारिक वेशभुषेमध्ये दुचाकी रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मा. नगरसेवक सागर गवळी व भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस कविता भोंगाळे यांनी केले.
Discussion about this post