व्हीएसआरएस मराठी न्युज –संतांचा भागवत वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी कीर्तनकार,प्रवचनकार,संत साहित्याचे प्रचारक,लेखक,तसेच दिंडीचालक,गायक,वादक यांना सन्मानपूर्वक निमंत्रित अतिशय महत्वपूर्ण असे एकदिवसीय राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संत विचारांचा प्रामाणिकपणे प्रचार प्रसार करणाऱ्या सर्वांना एकत्र करणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, संतांचे खरेखुरे विचारांची जोपासना करणे इत्यादी विषय होणार आहेत. तसेच काही मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
आपण या वारकरी संमेलनास सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहान वारकरी समाज यांनी केले आहे.
स्थळ.- मुक्ताई लॉन चऱ्होली फाटा आळंदी – पुणे रोड.
वेळ.- बुधवार 20 सप्टेंबर 2023
रोजी सकाळी 8 ते सायं.5 वाजेपर्यंत दोन सत्रात होणार आहे.
उद्घाटक – पद्मविभूषण खासदार मा.शरदचंद्रजी पवार साहेब.
अध्यक्ष- मा.दिनकर शास्त्री भुकेले.
इतर प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत.
Discussion about this post