व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी नगरसेवक प्रमोद कुटे युवा मंचच्यावतीने जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त आकुर्डी रस्त्याजवळील साई बाग चौक येथे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुमारे ५०० मराठी स्वाक्षरी करून उपक्रमात सहभाग घेतला. मराठी स्वाक्षरी करणाऱ्यांना यावेळी मोफत मास्कचे सुद्धा वाटप करण्यात आले.
यावेळी पिंपरी विधानसभा संपर्क प्रमुख वैभवजी थोरात, शहर संघटिका उर्मिलाताई काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी शिवसेना प्रभाग क्र 14 चे कार्यकर्ते यांनी परिश्रम केले होते.
Discussion about this post