व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-येरवडा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात , भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारे सर्वधर्मसमभाव हीच खरी देशाची ताकत असून ,जगासाठी खरा आदर्श असल्याचे मत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वारकरी संप्रदाय आणि येरवडा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले.
पुणे शहर पोलिस व शाहदल बाबा दर्गा कमिटीच्या वतीने या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते.
वारकरी मंडळाने या वेळी शाहादल बाबा यांच्या दर्ग्यात भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम साजरा केला .या कार्यक्रमास परिसरातील हिंदू ,मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता .यावेळी ह.भ.प सचिन महाराज निकम ,आनंद कुलकर्णी ,शिवाजी पवार आयोजक इक्रम भाईजान , माजी नगरसेवक , रिपबलिकन पक्षाचे मुस्लिम आघाडीचे प्रदेशध्यक्ष अयुब शेख ,नगरसेवक अविनाश साळवे ,राष्ट्रवादी नेत्या विद्याताई लोळगे ,पोलिस उपायुक्त किशोर जाधव ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख यासह नागरिक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Discussion about this post