व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा सामाजिक सुरक्षा विभाग मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने धडाकेबाज कामगिरी करता कारवाई करत आहे.
अश्यातच सामाजिक सुरक्षा विभागाने आकुर्डी येथील दत्तवाडीमध्ये गुटखा वाहतूक केली जाणारा असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचत सामाजिक सुरक्षा पथकाने दोघांवर करवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 1 लाख 16 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यावेळी अतुल छाजेड, आलम उर्फ सलमान पठाण या दोघांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडं शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. यामध्ये शहारत गाव गुंडगिरी करताफिरणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळलया आहेत. याचा प्रकारे पिंपरी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत अमित भुरेलाल सौदे आणि सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश हनुमंत मोटे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई कारवाई करण्यात आली आहे. सौदे टोळीवर खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, शस्त्र बाळगणे असे 13 गुन्हे दाखल आहेत तर, मोटे टोळीवर एकूण 25 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस या गुन्हेगारांच्या शोधात होते.
Discussion about this post