व्हीएसआरएस मराठी न्युज देहु-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे पालखी सोहळ्याला शासनाच्या नियम,अटी, निर्बन्धाचे स्वरूप होते त्यामुळे कमी मोजक्या लोकांमध्ये पालखी सोहळा लालपरीने(बसने) नेण्यात आला होता.
यंदा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा ज्येष्ठ कृ. सप्तमी म्हणजेच २० जून २०२२ रोजी श्रीक्षेत्र देहूतील मुख्य मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.संस्थानच्यावतीने या पालखी सोहळ्यासाठी पालखी प्रमुखांची घोषणा करण्यात आली. पाळखी सोहळा प्रमुख म्हणून देहू संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे,संतोष नारायण मोरे,माणिक गोविंद मोरे, यांची निवड संस्थांनचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी जाहीर केली.यावेळे संस्थानचे विश्वस्त संजय दामोदर मोरे,अजित लक्ष्मण मोरे व भानुदास अंकुश मोरे हे उपस्थित होते.
Discussion about this post