व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना ईमेल करुन तक्रार दाखल करण्यात आली आहे. निगडी येथील पी सी एम सी कॉलनी येथील इमारत धोकादायक म्हणून जाहीर करून येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे ६७६ कुटुंब हया ठिकाणी वास्तव्य करत असून इमारत नादुरुस्त अवस्थेत असून इमारत जिना तुटलेल्या अवस्थेत असून शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक महिला वर्ग ह्यांना जिना चढून जाण्यासाठी येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे दुसरीकडे पाईप लाईन लिकेज् होत आहे.
कंपाऊंड भिंत तुटलेल्या अवस्थेत असून इमारत स्लॅप पावसाळ्यात गळत असून लाईट मीटर काढून टाकले आहे गेल्या ४० वर्षांपूर्वी चतुर्थ श्रेणी कर्मचारी ह्यांना राहण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी सदर इमारत बांधकाम केले होते सध्या पी सी एम सी कॉलनी इमारत धोकादायक इमारत म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी जाहीर करून येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली असून ५७६ कुटुंब हया ठिकाणी वास्तव्य करत असून पी सी एम सी कॉलनी येथील नागरी समस्या निराकरण करण्यासाठी खुद्द पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्यात यावी ही विनंती काळभोर यांनी केली.
ओला व सुका कचरा विल्हेवाट लावली जात नाही ह्या ठिकाणी कचरा पडलेला असून साफसफाई होत नाही. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे गवत वाढलेले असून मच्छर मोठ्या प्रमाणावर झाले आहे पाण्याची टाकी स्वच्छता व्यवस्थित होत नाही. डेनेज लाईन तुटलेल्या अवस्थेत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन पी सी एम सी कॉलनी येथील इमारत धोकादायक इमारत म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी जाहीर करून येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे म्हणून काळभोर यांनी मागणी केली आहे.
Discussion about this post