व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकाच दिवशी आल्याने सामाजिक सलोखा राखावा असे आवाहन निगडी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे यांनी केले.
सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होतील असे स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, ठाकू नका असे आवाहन पाटील मॕडय यांनी केले.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर निगडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलिस निरीक्षक गुन्हे तेजस्विनी कदम यांच्या उपस्थितीत मस्जिद चे सर्व मौलाना, व समाजिक कार्यकर्ते यांची बेठक झाली.
यावेळी जमीयत . आहिद शकिलाह शेख,मौलाना शफात अली शेख,कासीम खान, बशीर सुतार,सादीक शेख,इखलास सय्यद ,जिशान सय्यद ,शकीलभाई ,अक्रम शेख ,फारूक शेख,बाबा आलम,यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरिक्षक उंडे यांनी मार्गदर्शनपर सुचना केल्या. त्यामध्ये उघड्यावर कुरबानी करू नये. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये.
जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. सध्या सोशल मीडिया वापरत असताना आपण कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपहार्य मेसेज कोणाला पाठवू नये अशा सुचना केल्या.
आणी बकरी ईद निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या .
Discussion about this post