व्हीएसआरएस मराठी न्युज -दि. २२ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी.उपमुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते, राजकारणातील ‘ दादा ‘ व्यक्तिमत्त्व, पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीचे चे शिल्पकार व भाग्यविधाते आदरणीय श्रीअजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा संचलित यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा भोसरी,पुणे २६ येथील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल तर्फे अल्पोपहार अन्नधान्य साहित्य वाटप करण्यात आले
व दादांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला पिं.चिं शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,महीला शहराध्यक्ष .सौ कविताताई आल्हाट,मुख्यसंघटक मा. श्री अरुण बो-हाडे, कामगार सेल शहराध्यक्ष श्री किरण चंद्रकांत देशमुख, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष संदीप शिंदे,भोसरी विधानसभा उपाध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड, कार्याध्यक्ष युवराजभाऊ पवार, आकाश पालकर , शिवाजी वलवणकर
अर्बन सेलचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप इ.ऊपस्थित होते. या उपक्रमासाठी कामगार सेलचे नवनाथ शिंदे ,दामोदर वहिले, सुरेश झावरे, सोपान म्हेत्रे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी मदत केली.
Discussion about this post