व्हीएसआरएस मराठी न्युज – नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चिंचवड येथील थरमॅक्स चौकामध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात आले…
सरकारचा धिक्कार असो.. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे नाशिक फाटा, कासारवाडी येथे सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. सुरत येथील स्थानिक न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्राकडून चालविला गेला आहे. आता तर त्यांना घर खाली करण्याचा आदेश देण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षातील प्रमुख नेत्याला जर अशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या वाट्याला काय येईल याची कल्पनाच न केलेली बरी!!
केंद्राच्या याच जुलमी कारभाराविरुद्ध पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तसेच शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या संकल्पनेतून नाशिक फाटा, कासारवाडी येथे नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आाली. या मोहिमेत सहभागी होत स्वाक्षरी केली आहे. यावेळी अजित गव्हाणे, शाम अण्णा लांडे आणि राहुल भोसले हे देखील उपस्थित होते.
Discussion about this post