Pimpri News : पिंपरी : चिखलीतील पूर्णानगर परिसरात दोघांनी शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने ३८ जणांना १ कोटी १२ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातला असून हा प्रकार २०१५ ते २०२४ या काळात घडला. या प्रकरणी चिखली पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.प्रशांत सीताराम खाडे, सीताराम खाडे (रा. खटाव, जि. सातारा)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सुहास बजरंग शेजवळ (वय 56, रा. चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे.
आरोपींनी तक्रारदार आणि त्याच्या ३७ सहकार्यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे डीमॅट अकाऊंट काढल्याचे सांगत त्यांच्याकडून १ कोटी १२ लाख २८ हजार घेतले. सुरुवातीला काही दिवस त्यावर चांगला परतावाही दिला. मात्र, कालांतराने परतावा देणे बंद केले आणि फसवणूक केली.
Discussion about this post