Pimpri News : पिंपरी : देशभरात कोरोना आणि नवा व्हेरीएंट जेएन १ यांची रुग्ण आढळू लागल्याने राज्यशासन सावध झाले असून कोरोना टास्क फोर्सची स्थापनाही करण्यात आली आहे. राज्यातील इतर अनेक महापालिकांनी आपापल्या परीने पावले उचलण्यास सुरुवात केली असताना पिंपरी चिंचवड महापालिका मात्र टीडीआर प्रकरणात व्यस्त होती. अखेर काल राज्यशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून आयुक्त शेखर सिंह यांनी टीडीआर घोटाळ्यावर पालिकेची बाजू स्पष्ट करताना माध्यम प्रतिनिधींशी या विषयावरही माहिती दिली.
नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी. पूर्वव्याधी असणार्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. मास्क वापरावा असे आवाहन त्यांनी केले. रूग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या रूग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेटिलेटरसह सर्व काही उपलब्ध आहे. सध्या आढळणा-या काेराेना रूग्णामध्ये साैम्य लक्षणे आढळत आहे.त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असेही आयुक्त म्हणाले.
Discussion about this post