Pimpri News: पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात १६ एप्रिल रोजी सायंकाळी सोसाट्याच्या वार्यामुळे एकंदर २४ झाडे आणि २ कटआऊट उन्मळून पडले.
मागील चार दिवस तापमान सातत्याने वाढत आहे. १६ एप्रिल रोजी सायंकाळी शहरात काही ठिकाणी पावसाचा हलकासा शिडकावा झाला. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे शहरातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.तर पिंपरी मार्केटमध्ये दोन मोठे कटआऊट कोसळले. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली.
झाडे कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाने त्या त्या ठिकाणी जाऊन झाडे हटविण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
Discussion about this post