Pimpri News : पिंपरी : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी आज मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यामध्ये ऑटोक्लस्टर, चिंचवड येथील मतदान साहित्य वाटप व स्विकृती केंद्र आणि निगडी प्राधिकरण येथील डॉ.हेडगेवार भवनातील स्ट्राॅंगरूमची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सोयीसुविधा देण्याबाबत सूचना दिल्या.
या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, तहसीलदार जयराज देशमुख, नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
२०६ पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आज मतदान यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले होते, त्याचीही पाहणी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केली व प्रशिक्षकांसमवेत संवाद देखील साधला.
पिंपरी विधानसभा मतदारसंघांमधील विविध भागातील ८५ इमारतींमध्ये एकूण ३९९ मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर आहेत. या मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या ३ लाख ६४ हजार ८०६ इतकी आहे.
Discussion about this post