Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील देहुरोड पोलीसठाण्याच्या पथकाने छापखान्यात बनावट नोटा छापून त्या चलनात आणणार्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ६ जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून प्रिंटिंगप्रेस, लॅपटॉप, प्रिंटर, पैसे मोजण्याची मशीन, इंडीयन करंसी पेपर, शाई, पेपर कटींग मशिन व इतर नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रिंटिंगप्रेसचा चालू केलेला धंदा चालेना म्हणून त्यांनी हा उद्योग केल्याचे समोर आले आहे.
ऋतीक चंद्रमणी खडसे, वय २२ वर्षे, रा. कंद पाटीलनगर नं.९ विठ्ठलवाडी, देहूगांव, पुणे, सुरज श्रीराम यादव, वय ४१ वर्षे, रा. ग्लोबल हाईटस, फ्लॅट नं. १०४, तनिष्क सोसायटी समोर, चोली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे, आकाश युवराज धंगेकर, वय २२ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, विठ्ठल मंदीरामागे, वनसे शशिकांत यांची रूम, आकुर्डी, पुणे, सुयोग दिनकर साळुंखे, वय ३३ वर्षे, रा. दत्तवाडी, डिकॉस्टा यांची बिल्डींग, श्री मेडीकलच्या मागे आकुर्डी, पुणे तेजस सुखदेव बल्लाळ, वय १९ वर्षे, रा. रामनगर कॉलनी चक्रपाणी वसाहत, नाईकवाडे यांची बिल्डींग, राम मंदीर शाळेजवळ, भोसरी, पुणे. प्रणव सुनिल गव्हाणे, वय ३० वर्षे, रा. मुक्ताई हाईटस, फ्लॅट नं. २०१, आळंदी रोड, भोसरी, पुणे यांना अटक करण्यात आली आहे
२५ फ़ेब्रुवारी रोजी एक व्यक्ती,मुकाई चौक परिसरात बनावट नोटा वितरीत करणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली,मुकाई चौकातून आदर्शनगरकडे जाणार्या रस्तावर सापळा रचून ऋतीक चंद्रमणी खडसे याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडीत ५०० रुपयांच्या १४० बनावट नोटा आढळल्या, त्याच्यावर देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये ९३ / २०२४ क्रमांकाने भा.दं.वि. कलम ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे तपास केला असता त्याने या नोटा भोसरीगावाच्या हद्दीत, दिप लॉन्स जवळ, दिघी मॅक्झीन, ता. हवेली, जि. पुणे येथील गोडसे यांच्या गाळा नं. ०९ मध्ये छापत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तेथे छापा घातला असता ०४ जण ऑफसेट प्रिंटींग मशिनवर बनावट नोटा छापताना पोलिसांच्या हाती लागले. त्यांना ताब्यात घेत, पोलिसांनी ऑफसेट प्रिंटींग मशिन, लॅपटॉप, प्रिंटर, पैसे मोजण्याची मशीन, इंडीयन करंसी पेपर, शाई, पेपर कटींग मशिन व इतर नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. आरोपी सुरेश यादव याने आलीबाबा या वेबसाईटवर स्वतःचे अकाउंट उघडून चीन मधून भारतीय चलनासाठी वापरला जाणारा कागद ऑनलाईन मागविल्याचे दिसून येत आहे. त्यासर्वांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ७ दिवसांची पोलीसकोठडी दिली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त परिमंडळ – २ बापू बांगर, सहाय्यक आयुक्त, देहुरोड विभाग घेवारे, वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आशिष जाधव, हवालदार बाळासाहेब विधाते, प्रशांत पवार, नाईक सुनिल यादव, अंमलदार किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, मोहसीन आत्तार, युवराज माने, विवेक भिसे, राजेंद्र चव्हाण, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे, सागर पंडीत, निलेश जाधव यांनी केली.
Discussion about this post