Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली, सानेचौक येथे २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाला गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुलेही जप्त करण्यात आली आहेत.
तुषार गौतम झेंडे (वय २६, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन मोरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकला माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसपथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुले आणि चार राऊंड जप्त केले आहेत.
Discussion about this post