पिंपरी : बिगबॉस फेम अभिजित बिचुकले अज दि. ४ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत. वाल्हेकरवाडी येथे इंदिरामाई स्वस्त थाळी व चौपाटीचे उद्घाटन आणि पै. खाशाबा जाधव क्रीडा पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे.
राष्ट्रीय खेळाडू अनन्या वाल्हेकर हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा संकुल व स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ५ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. ही माहिती पिंपरी चिंचवड आय काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी दिली.
या बाबत बोलताना वाल्हेकर म्हणाले; वाल्हेकरवाडी परिसरात श्रमिकांची संख्या जास्त आहे. अल्प पगार व वाढती महागाई, बेकारी यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. त्यांच्या जगण्याला हातभार लागावा यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू करत आहोत.
अल्प दरात इंदिरामाई स्वस्त थाळी व चौपाटी हा उपक्रम यासाठीच हाती घेतला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची अल्प दरात जेवण व नास्त्याची सोय होणार आहे.
या कार्यक्रमाला बिग बॉस फेम अभिजित बिचुकले, माजी मंत्री रमेश बागवे, आय काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या निमित्ताने चौपाटी वरील सर्व पदार्थ आज मोफत असणार आहेत असेही वाल्हेकर यांनी सांगितले.
Discussion about this post