Pimpri News : पिंपरी : मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील या युतीच्या तीन प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. बारणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, रामशेठ ठाकूर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. याशिवाय मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारणे हे यापूर्वी दोनवेळा शिवसेना, भाजप युतीतर्फे या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव करून ते ‘जायंट किलर’ ठरले होते. यावेळी खुद्द अजित पवार बारणे यांच्या प्रचारात सहभागी झाले असल्यामुळे ही त्यांच्या जमेची बाजू बनली आहे.
Discussion about this post