Pimpri News : पिंपरी :मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी आणि तेथून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवडमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे केली आहे; अशी माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पुणे इन्स्टिट्यूट डायरेक्टर चेतन गवळी, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे, प्रसाद कोलते, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माछरे, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष सागर बोराटे, प्रशांत सपकाळ, चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतीक साळुंखे, गणेश गायकवाड, संकेत जगताप, भागवत जवळकर, ओंकार विनोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीने मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा दाखल केला असून जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांना राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी आज मंगळवारी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, चेतन गवळी, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे, प्रसाद कोलते, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माछरे, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष सागर बोराटे, प्रशांत सपकाळ, चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतीक साळुंखे, गणेश गायकवाड, संकेत जगताप, भागवत जवळकर, ओंकार विनोदे आदी उपस्थित होते.
अजित गव्हाणे पुढे म्हणाले, पिंपरी, मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत.या मतदारसंघात राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण आहे.त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळावी आणि पिंपरी चिंचवड, मावळसह उरण, कर्जत, पनवेलमध्ये दांडगा लोकसंपर्क असणार्या ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांना तेथून उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही आग्रही आहोत.
माजी विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, ”जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. सन १९९२ साली महानगरपालिकेवर नगरसेवकपदी ते पहिल्यांदा निवडून आले होते. तेव्हापासून सलग ५ वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून येत आहेत.शहरातील विकासकामे, पक्षाची ताकद, भाऊसाहेब भोईर यांची दीर्घ कारकीर्द पाहता मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांच्यासाठी निश्चितपणे योग्य राहील.
Discussion about this post