पिंपरी : पवनाधरणात बुडून २६ जानेवारी रोजी एका पर्यटकाचा मृत्यू झाला. एकाला वाचविण्यात गावकर्यांना यश आले सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना ठाकूरसाई येथे घडली.
मनिष शंकर शर्मा (वय-२०, रा.मुंबई) असे मृत पर्यटकाचे नाव आहे.तर आदित्य सचिन बुंदेले (वय-२०, रा. नागपूर) याला नागरिकांनी वाचविले.
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील बाळासाहेब विखे पाटील मेडिकल कॉलेजचे १५ विद्यार्थी फिरण्यासाठी मावळात आले होते.ठाकुरसाई येथे त्यातील चौघेजण पोहोण्यासाठी पाण्यात उतरले. मनीष आणि आदित्य या दोघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यांची दमछाक झाली. त्यामुळे ते बुडू लागले. हे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला. यावेळी शिवदुर्ग मित्र या संस्थेचे सदस्य आकाश शांताराम मोरे व ठाकुरसाईचे सुनील भाऊ ठाकर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र, मनिषला वाचविण्यात त्यांना अपयश आले.
दुर्घटनेचे वृत्त कळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Discussion about this post