Pimpri News : पिंपरी : राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या वतीने आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
भाजप जिल्हाध्यक्ष शंकर जगताप, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे,आमदार महेश लांडगे,अश्विनी जगताप, उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.आंदोलनात जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करुन अटक करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अमित गोरखे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, शैला मोळक, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, निलेश अष्टेकर, राजेंद्र बाबर, रविंद्र देशपांडे, माजी नगरसेविका योगीता नागरगोजे, वैशाली खाडये, नामदेव पवार, आकाश भारती, ॲड.गोरक्ष कुंभार, अॅड.मंगेश नढे, प्रदीप भिगसे, सुरेश हराळ, अॅड. सुरेश सप्रे, अॅड. दत्ता झुळूक, अॅड.अंकुश गोयल, अॅड. पल्लवी विघ्ने, सचिन काळभोर, सिध्देश्वर बारणे, सिमा चव्हाण, रवि दाभाडे, भरत ठाकूर, शोभा दराडे, निता कुशारे, रणजीत कलाटे, अक्षय वाघमोडे, गणेश ढोरे, युवराज ढोरे, संजय बढे, रामदास कस्पटे, रविंद्र प्रभुणे, नागनाथ गुहे, सुशीला फड, प्रदीप पटेल, भगवान निकम, अॅड. गोरक्ष झोळ, अॅड. मंगेश निहारे, अमित सोनकर, विजय पवार, भूषण जोशी, पल्लवी पाठक, दिपाली कलापुरे, विमल काळभोर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आंदोलनाला उपस्थित होते.
Discussion about this post