Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांचे पंख छाटले आहेत. त्यांच्याकडील वायसीएम रुग्णालयाची जबाबदारी काढून घेऊन ती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे सोपविली आहे.
यापुढे डॉ. राजेश वाबळे यांच्याकडे केवळ पदव्युत्तर पदवी संस्थेचे कामकाज राहणार आहे.
वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर डॉ. राजेश वाबळे यांना दिल्लीहून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी आणले गेले. मात्र, नंतरच्या काळात वायसीएम रुग्णालयातफारच अनागोंदी कारभार सुरू झाला.लोकनियुक्त प्रतिनिधींकडेही दुर्लक्ष करण्यात येऊ लागले. त्यामुळे लोकप्रतिनिधीही त्रासले होते. वायसीएम रुग्णालयाचे नियंत्रण महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडे असावे अशी मागणी होऊ लागली होती. अखेरीस आयुक्त सिंह यांनी हा निर्णय घेतला.
Discussion about this post