Pimpri News : पिंपरी : महाशिवरात्री निमित्त आकुर्डी येथे विश्व श्रीराम सेना अध्यक्ष ॲड लालबाबू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली दूध व केळी वाटप करण्यात आले. त्यावेळी अक्रम शेख, डॉ पंकज गुप्ता, ॲड अमिन शेख, अमान शेख, शाहीद शेख,प्रफुल काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शहर व परिसरात शिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक ठिकाणी भाविकाना फराळ साबुदाणा खिचडी, केळी, दूध आदी फराळाचे वाटप करण्यात आले . या पवित्र पर्वावर शहरातील विविध शिवमंदिर सजविण्यात आली होती.
महाशिवरात्री निमित्त पहाटेपासूनच मंदिरे दर्शनार्थ खुली ठेवण्यात आली.पहाटेपासून शिवास महाअभिषेक, जलाभिषेक, रुद्राभिषेक घालण्यात येवून साजश्रृंगार करण्यात आला. मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली. जागरण, कीर्तन, पारायण आदीसह धार्मिक कार्यक्रम झाले.
महादेव मंदिर येथे दर्शनाकरीता भाविकानी अलोट गर्दी केली होती. मंदिर परिसरात हर हर महादेव, बम बम भोले, शिवपार्वती की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमला. शिव मंदिराबाहेर बेल, पुष्पहार, नारळ, पुजेचे साहित्य विक्रेत्यानी दुकाने लावली होती.
महाशिवरात्री निमित्त फराळाची दुकाने ठिकठिकाणी थाटली होती. केळी, रताळे, चिप्स, मावा जिलेबी यासह साबुदाणा खिचड़ी व वडे, राजगिरा लाडू, मोसंबी, सफ़रचंद, संत्री, बटाटे वेफर्स, चिक्की आदी फराळाच्या पदार्थांची दुकाने सजली होती.
Discussion about this post