Pimpri News : पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सामान्य करात 30 टक्के, दिव्यांगाना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. माजी सैनिकांना 100 टक्के सवलत लागू आहे. यापूर्वी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. तसेच 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अवघ्या दीड महिन्यात 25 टक्के मालमत्ता धारकांनी दाेनशे काेटी रूपयांचा कर महापालिका तिजाेरीत जमा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी 30 जूनपर्यंत विविध मालमत्ता कर सवलतीच्या लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळ्या जमीन, मिश्र अशा सहा लाख 28 हजार मालमत्ता आहेत. नागरिकांना मालमत्ता कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासह सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 30 जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. गतवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेने महिला बचत गटामार्फत बिलांचे वेळेत वाटप केले आहे. मालमत्ताधारकांना बिल मिळताच कर भरण्यास ते प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच अवघ्या दीड महिन्यात 1 लाख 81 हजार 968 मालमत्ता धारकांनी तब्बल दाेनशे काेटी 39 लाख रूपयांचा कर भरणा केला आहे.
Discussion about this post