Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दोन खंडणीखोर पोलिसांना सेवेतून बडतर्फ केले असून अमलीपदार्थ तस्करी प्रकरणात पोलिस कोठडीत अटक केलेल्या उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.
काही दिवसांपूर्वी देहुरोड पोलीसठाण्यातील हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ या दोन कर्मचार्यांनी एका येथे शिक्षण घेत असलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या केसमध्ये अडकवून त्याला अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली आहे.
तर पिंपळे निलखमध्ये १ मार्च रोजी पहाटे पकड्ण्यात आलेल्या अमलीपदार्थ वाहून नेणार्या तरुणाने उपनिरीक्षक विकास शेळके याचे नाव घेतल्याने चौकशीअंती पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यालाही निलंबित करण्यात आले आहे.
Discussion about this post