व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुणे येथील लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी येत्या पाच ऑक्टोबर रोजी मोदी पुण्यात येत आहे.
पुणे विमानतळावरील विस्तारीत नवीन टर्मिनल ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे आता हे टर्मिनल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोहगाव विमानतळ नवीन टर्मिनल सुरु करण्यात येणार आहे. हे टर्मिनल उभारण्यासाठी 525 कोटी रुपये खर्च आला आहे. टर्मिनलवर एरोब्रिज तयार केले गेले आहे. विमानतळावरील या टर्मिनलवर टेकऑफ आणि लॅण्डींगसाठी नव्या सुविधा विकसित केल्या आहेत. सध्या पुणे विमानतळावरुन 90 विमाने रोज जात आहे. त्यानंतर नवीन टर्मिनलवर झाल्यावर 120 विमाने रोज टेक ऑफ आणि लॅण्डीग करतील.
Discussion about this post