व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आज पार ( Pune International Marathon ) पडली. यात देशाबाहेर असंख्य धावपटूंना सहभाग नोंदवला होता. विजेत्यांमध्ये भारतीय विजेत्यांचाही समावेश आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
यंदा झालेल्या नाईट फुल मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. या 42.195 किमी फुल मॅराथॉन स्पर्धेत इथोपियाच्या लेटा तेस्फाये गुटेटा या खेळाडूने 2 तास 17 मिनिटे 27 सेकंदात येऊन बाजी मारली. त्यांनतर दुसऱ्या क्रमाकांवर इथोपियाच्या उर्गा केबुबे खेळाडूने 2 तास 18 मिनिटे 17 सेकंदात आला आहे. तर यीबेगता झेंगेटा या इथोपियाच्या खेळाडूने 2 तास 20 मिनिटे 23 सेकंदात येऊन तिसरा क्रमांक पटकावला ( 36th year International Marathon ) आहे.
पुण्यातील सारसबाग जवळील सणस मैदान येथे कारगिलच्या लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेचे चेअरमन / चीफ एक्झिक्युटिव्ह काउंसिलर फिरोज अहमद खान यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नाईट मॅरेथॉन ला शुभारंभ करण्यात आले. विविध गटात रात्रभर झालेल्या या स्पर्धेनंतर सकाळी ८ वाजता या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सणस मैदान येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी खा. वंदना चव्हाण, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी उपमहापौर आबा बागुल व अन्य प्रमुख पाहुणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्व विजेत्यांना पुणे महानगरपालिके तर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.
Discussion about this post