व्हीएसआरएस मराठी न्युज -आण्णा भाऊ साठे बस स्टॉप ह्या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतगत १५ वर्ष करारनामा करून विनामूल्य जागा देण्यात आली त्या ठिकाणी रेड झोन एरिया मध्ये बेकादेशीर बांधकाम करून शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले.
त्या संदर्भात दोन तीन महिने झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व स्मार्ट सिटी अधिकारी ह्यांना लेखी पत्राद्वारे तक्रार दाखल करण्यात आली होती.
स्मार्ट सिटी अधिकारी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करून अतिक्रमण कारवाई करत नव्हते त्या संदर्भात दिनांक २४/११/२०२२ रोजी स्मार्ट सिटी कार्यालय ऑटो क्लस्टर चिंचवड ह्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करून निषेध व्यक्त करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांनी रेड झोन एरिया मध्ये बांधकाम केले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन बांधकाम परवाना देत नाही ,उलट पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन बांधकाम पाडते ह्या ठिकाणी स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व स्मार्ट सिटी अंतगत बेकादेशीर बांधकाम करून नियमांची पायमल्ली करत आहे .
अधिकारी व ठेकेदार ह्यांच्या मध्ये आथिर्क देवाण घेवाण करण्यात आली असून बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी स्मार्ट सिटी अधिकारी पाठबळ देत आहे.असे समाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी सांगितले .
सामान्य नागरिक ह्यांनी रेड झोन एरिया मध्ये बेकादेशीर बांधकाम केले, तर कारवाईचा बडगा उगारला जात आहे नियम सर्वांना सारखा असतो पण स्मार्ट सिटी ह्यांना वेगळी नियमावली लागू झाली आहे. ह्या संदर्भात लक्ष वेधून घेण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले .
यावेळी माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी उपोषण वेळी भेट देऊन माहीत घेतली.
सचिन काळभोर , पप्पू भोंडे, दिपक हाताळले, धमा हाताळले, हैदर शेख, रफीक शेख ,स्वप्निल पवार ,गणेश पुरी ,राजेंद्र काळभोर, शिवाजी काळभोर ह्यांनी लाक्षणिक उपोषण केले.
Discussion about this post