Pune News : पुणे : पुण्यातील बंडगार्डन, कोरेगाव पार्क परिसरातील साधू वासवानी पूल जीर्ण झाल्याने पुणे महापालिका तो पाडून त्या जागी नवा पूल बांधणार आहे. नवा पूल बांधून होईपर्यंत परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहतुकीमध्ये बदल केले आहेत.
वाहतूक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी या संदर्भात आदेश जारी केला आहे. त्यानुसार बंडगार्डन, कोरेगांव पार्क वाहतूक विभागाअंतर्गत पर्णकुटी चौक ते ब्ल्यू डायमंड चौक ते मोबोज चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे. मोबोज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रोड) असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे. अलंकार चौक ते आय.बी. चौक ते सर्कीट हाऊस चौक ते मोरओढा चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे. मोरओढा चौक ते कौन्सिल हॉल चौक असा एकेरी मार्ग करण्यात येत आहे. वर नमूद सर्व मार्गावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या जड, अवजड, मल्टीअॅक्सल वाहनांना २४ तास बंदी करण्यात येत आहे. काहुन रोड जंक्शन ते तारापूर रोड जंक्शन हा रस्ता पूर्वी प्रमाणेच एकेरी मार्ग राहील. कॉन्सिल हॉल चौक ते साधू वासवानी पुतळा मार्ग एकेरी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :
नगर रोडवरुन मोर ओढा चौकाकडे जाणारी वाहने पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, ब्ल्यु डायमंड चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास रोडने मोबोज चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौकी समोरुन पुन्हा डावीकडे वळण घेवून आय.बी. (रेसीडेन्सी क्लब) चौक, डावीकडे वळण घेवून सर्किट हाऊस चौक मार्गे
मोरओढा चौक कोरेगांव पार्ककडे जाणारी वाहने मोरओढा चौक, सरळ कौन्सिल हॉल चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्क
पुणे स्टेशन येथून कोरेगांव पार्ककडे जाणारी वाहने पुणे स्टेशन, अलंकार चौक, डावीकडे वळण घेवून जहाँगीर चौक, उजवीकडे वळण घेवून मंगलदास चौक, पुणे स्टेशन, अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, डावीकडे वळण घेवून मंगलदास चौक, उजवीकडे वळण घेवून बंडगार्डन रोडने महात्मा गांधी उद्यान चौक, उजवीकडे वळण घेवून कोरेगांव पार्क
पुणे स्टेशन ते घोरपडीकडे जाणारी वाहने पुणे स्टेशन ते अलंकार चौक, सरळ आय.बी. चौक, सरळ सर्कीट हाऊस चौक मार्गे मोरओढा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
घोरपडी व भैरोबानाला चौकामधून येणाऱ्या सर्व बसेस (पी.एम.पी.एम.एल.सह) मोरओढा चौकाकडून सरळ जाऊन काहुनरोड जंक्शनवरून डावीकडे वळण घेवून तारापूर रोड जंक्शन वर येतील व उजवीकडे वळण घेवून तारापूर रोडने ब्ल्यू नाईल चौकाकडून उजवीकडे वळण घेवून कॉन्सील हॉल चौकामधुन इच्छितस्थळी जातील.
आय.बी. जंक्शन ते मोरओढा हा एकेरी मार्ग आवश्यक त्यावेळेस तात्पुरता दुहेरी करण्यात येईल.
ब्ल्यू डायमंड चौक ते साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क कडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे राहील.
Discussion about this post