Pune News : पुणे : कौशल्यविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या टॅलेंट कॉर्प सोल्युशन्सचे संचालक डॉ. महेबूब सय्यद यांनी आपल्या शेकडो सहकार्यांसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात नुकताच प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोशी येथे एका कार्यक्रमात त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयं रोजगार विभागाच्या प्रदेश अध्यक्ष मेघा पवार,माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे, बॉलिवूड अभिनेता गुरमीत सिंग, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजित गव्हाणे हे उपस्थित होते.
डॉ. सय्यद यांनी यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राभवून रोजगार, कौशल्य विकास, शैक्षणिक, शेती क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.रोजगार क्षेत्रात टॅलेंट कॉर्प सोल्युशनच्या माध्यमातून १५ हजार पेक्षा अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊन तसेच; नवोद्योजकांना मार्गदर्शन करून व्यवसायिक संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
अजितपवार यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून महाराष्ट्रात रोजगार आणि स्वरोजगार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे डॉ. महेबूब सय्यद यांनी म्हटले आहे.
Discussion about this post