Pune News : पुणे : पुण्यातील वारजे, माळवाडी पोलीसठाण्याच्या पथकाने एका चोराला अटक करून त्याच्याकडून ०९ लॅपटॉप, ०३ मोबाईल फोन व ०१ मोटारसायकल असा ४ लाख ६२ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
तेजस दत्तात्रय सुर्यवंशी, वय- २३ वर्षे, रा. मगनपुरा, नवमोंढा, जि. नांदेड असे या चोराचे नाव आहे. तो मागील एक वर्षापासून डीएमएलटीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आला आहे. शिक्षण घेत असतानाच तो झोमॅटोमध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याने कुठे मुलांची हॉस्टेल्स आहेत, ती मुले कधी बाहेर जातात, कधी परततात याची टेहळणी करून हॉस्टेल्समधील मुलांच्या चिजवस्तूंवर हात साफ करायला सुरुवात केली.
वारजे माळवाडी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. यामुले पुणे शहरातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी सहायक निरीक्षक रणजित मोहिते, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे तसेच अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे,विजय भुरुक, बंटी मोरे, मनोज पवार, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, शिरीष गावडे, अजय कामठे, शरद पोळ, सत्यजित लोंढे व रियाज शेख यांनी केली.
Discussion about this post