Pune News : लोणावळा : पुणे लोणावळा लोकलच्या फेर्या पूर्ववत सुरू करा, पूर्वीप्रमाणेच सर्व गाड्या लोणावळ्यात थांबवा आणि दुपारच्या वेळेतही पुणे लोकल सुरू करा या मागण्यांसाठी लोणावळ्यातील नागरिकांनी रेल्वेट्रॅकवर ठिय्या आंदोलन केले. यामुळे पुणे ते मुंबई धावणारी डेक्कनक्विन वीस मिनिटे रखडली.
आंदोलकांनी रेल्वेपोलिसांनी आवाहन केल्यानंतर आंदोलक बाजूला झाले. आंदोलकांचे निवेदन स्टेशनमास्तरांनी स्वीकारले.येत्या १० दिवसात मागण्यांप्रमाणे कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करून सर्व गाड्या अडवण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला,
दरम्यान मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पुणे लोणावळा मार्गावर दुपारीही लोकल सुरू कराव्यात अशी मागणी केली होती. त्याला रेल्वेराज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Discussion about this post