Pune News : पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांच्यासह त्यांच्या ५ साथीदारांना १४ जानेवारी रोजी रात्री वाशीनजिकच्या फार्महाऊस मधून अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी आजवर अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता १४ झाली आहे.
पनवेल शहर पोलिसांनी ही कामगिरी केली असून अटक केलेल्या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
विठ्ठल शेलार याने २०१७ साली पुण्याचे तेव्हाचे पालकमंत्री गिरीश बापट आणि तेव्हाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याची युवाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
शेलार हा मुळशी तालुक्यातील रहिवासी असून तो देखील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि अपहरणासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.त्याला २०१४ साली मोक्का लावण्यात आला होता.२०१७ मध्ये जामीनावर सुटल्यानंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Discussion about this post