व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरीः निगडी येथील यमुनानगर भागातील आण्णा भाऊ साठे मैदानावर बेकादेशीर खेळणी व पाळणा उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी मैदानावर रुम ताब्यात घेऊन काही समाजकंटकांनी अतिक्रमण केलेले आहे. या मैदानावर नवरात्री उत्सवानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात येत असून, उत्सवासाठी आण्णा भाऊ साठे मैदानावर बेकादेशीर अतिक्रमण करून खेळणी व पाळणा उभारण्यात आला आहे. मैदानावर राडारोडा पडलेला आहे. त्या ठिकाणी तंबू ठोकण्यात आले असून, नागरिकांना सकाळ संध्याकाळ व्यायाम करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. उद्यानावर राडारोडा करणाऱ्यांवर तसेच उद्यान बकाल होण्यास जबाबदार असणाऱ्यावर महापालिकेने तात्काळ कारवाई, करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अंतर्गत फ क्षेत्रिय कार्यालय अधिकारी सिताराम भवरे यांनी सांगितले की सदर मैदान फ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत येत नसून, महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात यावी. तर क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे की सदर मैदान फ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत असून सदर मैदान क्रीडा विभागाच्या ताब्यात नाही. अशा प्रकारे दोन्ही विभाग जबाबदारी स्वीकारण्यास नकार देऊन सरळसरळ टोलवाटोलवी करत आहेत.
तर दुसरीकडे आण्णा भाऊ साठे मैदानावर शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर रोज सकाळी संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी येत असतात. सध्या आण्णा भाऊ साठे मैदानावर पाळणा व खेळणी साहित्य उभारण्यात आले आहे. त्यासंदर्भात आयोजकांनी कोणत्याही प्रकारची परवानगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून घेतली नाही. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व क्रीडा विभाग व फ क्षेत्रिय कार्यालयाने आण्णा भाऊ साठे मैदानावर खेळणी व पाळणा तसेच स्टोअर रूमसाठी परवानगी देण्यात आली नाही. त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी मैदानावरच पाच स्टोअर रूम ताब्यात घेऊन त्या रुमचा वापर सुरू केला आहे. यामुळे या यमुनानगर भागातील नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रिय अधिकारी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग गांभीर्याने लक्ष देत नाही. तर दुसरीकडे आण्णा भाऊ साठे मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून राडाराडा टाकून मैदानावर बकालपणा निर्माण केला आहे. या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आण्णा भाऊ साठे मैदान नागरिकांना व्यायाम करण्यासाठी खुले करून देण्यात यावे. जेणेकरून नागरिकांमध्ये उत्साह संचारला पुन्हा आण्णा भाऊ साठे मैदानावर सकाळ संध्याकाळ व्यायाम करण्यासाठी नागरिकांना सोयीस्कर होईल, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Discussion about this post