व्हीएसआरएस मराठी न्युज – केंद्रीयसशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.
त्यामुळे रश्मी शुक्ला लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती आहे.
विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ संपत असल्याने शुक्ला यांची महासंचालक पदावर निवड होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला या १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू मानल्या जातात.
Discussion about this post