व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; तर डॉ सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. तर डॉ संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु आहे.
डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ रवींद्र कुलकर्णी व डॉ सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
Discussion about this post