व्हीएसआरएस मराठी न्युज -एप्रिल महिना सुरू झाला असतानाच उन्हाचा चटकाही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, महापालिकेचा मोहननगर येथील जलतरण तलाव गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांमधून पालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे या जलतरण तलावाची तत्काळ दुरूस्ती करून सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केली आहे. तसेच तलावाजवळ असलेले क्रीडागण, हॉलीबॉल, स्केटींग गाऊंड, टेनिस लॉनची दुरूस्ती करावी, अशी मागणीही काळभोर यांनी केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात विशाल काळभोर यांनी म्हटले आहे की, महापालिकेचे शहराच्या विविध भागातील 13 जलतरण तलावांपैकी 8 तलाव सुरू असून 5 तलाव बंद आहेत. मोहननगर येथील छत्रपती श्री राजश्री शाहू महाराज जलतरण तलावावर मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, आकूर्डी, रामनगर, इंदिरानगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर यासह आदी भागातील नागरिक, मुले पोहण्यासाठी येत होते. मात्र, हा तलाव करोनाच्या अगोदरपासून खोली कमी करण्याच्या नावाखाली बंद आहे. हा तलाव नियमापेक्षा जास्त म्हणजे 14 फूट खोल झाला आहे. तसेच मोहननगर जलतरण तलावाजवळच महापालिकेचे क्रीडांगण, हॉलीबॉल, स्केटींग गाऊंड, टेनिस लॉनची दुरावस्था झाली असून पालिकेचे दुर्लक्ष झाले असून त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
Discussion about this post