व्हीएसआरएस मराठी न्युज -निगडी (अक्रम शेख) स्व.यशवंतराव चव्हाण स्मारक खाजगी संस्था सातारा जिल्हा मित्र मंडळ अंतर्गत असून सन २०१८ रोजी सुद्धा कै आमदार लक्ष्मण जगताप ह्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना यशवंतराव चव्हाण स्मारक खाजगी संस्था ह्यांना पाच कोटी अनुदान देण्याबाबत मागणी केली होती त्या संदर्भात काळभोर यांनी विरोध केला होता त्या वेळी अनुदान देण्यात आले नव्हते आता अश्विनी जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना पाच कोटी अनुदान देण्याबाबत मागणी केली असून परत सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर यांनी विरोध केले आहे.
निगडी-प्राधिकरणातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे अद्ययावत स्मारकाची संपूर्ण इमारत बांधण्याचा खर्च १५ कोटी रुपये आहे. या स्मारकाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निधीतून पाच कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. आमदार अश्विनी जगताप यांनी या मागणीचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे केला. त्यांनी स्मारकाला पाच कोटी रुपये अनुदान देण्याचे तत्काळ जाहीर केले.थेरगाव येथे शुक्रवारी (ता. १६) आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावेळी शिंदे यांना स्मारकाचे शिष्टमंडळ भेटले. यावेळी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र दिले. जगताप यांनी दिलेल्या पत्रात ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रभर राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणामुळे पिंपरी चिंचवडसह संपूर्ण राज्यात उद्योगधंदे सुरू होऊन, अल्पावधीतच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपास आले. याच कार्याची स्फूर्ती भावी पिढ्यांना मिळावी म्हणून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीमार्फत उद्योग नगरीतील निगडी प्राधिकरणातील ४४ गुंठ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे अद्ययावत स्मारक करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सर्व सुविधांसह स्मारकाचा आराखडा मंजूर करून, चार मजल्यापर्यंतचे इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
संपूर्ण इमारत बांधण्याचा खर्च अंदाजे १५ कोटी रुपये आहे. परंतु; स्मारकाचे काम पूर्ण न होऊ शकल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे स्मारकाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निधीतून पाच कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे.’ असे म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात ‘यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती व कार्याची माहिती भावी पिढीला व्हावी, या शुद्ध हेतूने पिंपरी चिंचवड शहरातील निगडी-प्राधिकरण येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला पाच कोटी रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते.
शहरातील जलतरण तलाव खाजगी करण सुरू असून त्या ऐवजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या वतीने जलतरण सुरू ठेवण्यात यावे अनुदान खिरापत वाटण्यापेक्षा जलतरण तलाव सुरू राहण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी आथिर्क तरतूद करण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे.
बचतगट अंध अपंग व्यक्तींना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी अनुदान स्वरूपात मदत करावी यशवंतराव चव्हाण स्मारक खाजगी संस्था ह्यांना अनुदान मदत करु नका.शहरातील अनाथ आश्रम अपंग संस्था वृद्धाश्रम ह्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी आथिर्क मदत करावी यशवंतराव चव्हाण स्मारक खाजगी संस्था ह्यांना पाच कोटी अनुदान देण्याबाबत त्या संस्थेचे शहरातील योगदान काय आहे असे काळभोर यांनी सांगितले आहे.
Discussion about this post