व्हीएसआरएस मराठी न्युज -संस्कार भारती पिं. चिं. समिती प्राचीन कला व ऐतिहासिक वास्तू विधेच्या वतीने आयोजित अभूतपूर्व मंदिरांच्या फोटोंचे भव्य प्रदर्शनाचे उदघाटन आज स्वा. सावरकर मंडळ निगडी येथील सभागृहात पार पडले.
कै.मोरेश्वर के कुंटे – विजया कुंटे यांनी पाहिलेल्या महाराष्ट्रातील 18 हजार मंदिरापैकी काही निवडक आगळ्या वेगळ्या अविस्मरणीय मंदिरांच्या फोटोच्या वैशिष्टपूर्ण प्रदर्शनाचे उदघाटन कोहिनुर ग्रुप पुणे चे प्रसिद्ध उद्योगपती श्री. कृष्णकुमार गोयल,श्रीमती अश्विनी ताई जगताप (आमदार चिंचवड).
श्री.मिलिंद तुळाणकर (सुप्रसिद्ध जलतरंग वादक) यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी श्री. प्रभाकर कुंटे व सौं. प्रियांका कुंटे यांसह संस्कार भारती पश्चिम प्रांताच्या उपाध्यक्षा सौं. सुवर्णा ताई बाग, प्राचीन कला व ऐतिहासिक वास्तू विधेच्या सह संयोजिका सौं. विनिता ताई देशपांडे, साहित्य विधेच्या प्रांत संयोजिका सौं. विशाखा ताई कुलकर्णी, पिंपरी चिंचवड समिती चे विधा संयोजक श्री. श्रीकांत चौगुले, श्री. अनिल दुधाने, समर्थ भारत चे श्री. सचिन राऊत, श्री. अजय चतुर्वेदी, श्री. जयेश मोरे सौं.शुभदा दामले, श्री.भाग्येश अवधानी, राकेश मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात वाजणारे दगड, तरंगणारे पाषाण हे विशेष आकर्षण असून श्री. श्री.मिलिंद तुळाणकर यांनी या दगडावर राष्ट्रगीत आणि ‘चॉकलेटचा बंगला’ हे बालगीत वाजवून दाखवले.
सदरचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून आजपासून दिनांक 27 नोव्हेंबर पर्यंत दररोज सकाळी 10 ते 8 असून सर्व कला रसिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन संस्कार भारतीचे अध्यक्ष श्री. सचिन काळभोर यांनी केले आहे.
Discussion about this post